Oh no... not again!
पुन्हा सण..
पुन्हा सगळे वातावरण फुलं-पान-सुगंध मय होणार..
पुन्हा सगळीकडे तोच उत्साह, तीच धावपळ येणार...
पुन्हा सण..
पुन्हा सगळे नातेवाईक एकत्र येण्याचे नाटक करणार..
पुन्हा तेच रुसवे फुगवे, त्याच चर्चा, तेच खाणे होणार...
पुन्हा सण..
पुन्हा हवा बदलणार, वार सुटणार किंवा थांबणार...
ऊन वाढणार किंवा कमी होणार, थंडी वाजणार किंवा पाऊस येणार
पुन्हा तेच आजारपण... त्याच सर्द्या, तेच खोकले येणार...
पुन्हा सण..
पुन्हा सण..
पुन्हा आपली 'त्याच्या'कडून अन 'त्याची' आपल्याकडून अपेक्षा वाढणार
त्याला भेटण्यासाठी आपण पुन्हा त्याच रांगेत थांबणार, किंवा नाहीही...
पुन्हा सण..
पुन्हा नव्याने सगळे जागे होणार
एका दिवसासाठी, पुन्हा झोपण्यासाठी
त्याच उत्साहाने... त्याच उन्मादाने... त्याच ग्लानीने....

No comments:
Post a Comment